इतिहासाचे प्रकारः
इतिहासाचे
प्रकारः
या लेखामध्ये आपण इतिहासाचे
प्रकार याबाबत माहिती घेणार आहोत.
प्रागैतिहासिक
काळः (इ.स.पू. २५ लाख वर्षापूर्वी - इ.स.पू. ३५००) : हा काळ मानवाच्या उत्क्रांतीचा व सुरूवातीच्या विकासाचा काळ असे म्हटले
जाते. या काळाचा कोणताही लिखित पुरावा उपलब्ध नाही.
या
काळाची उत्खननात सापडलेली हत्यारे, भांडी,
गुहांमधील चित्रांच्या आधारे माहिती मिळते. या काळात मानवाने शिकार
करण्यासाठी दगडाची, लाकडाची, हाडांची
हत्यारे वापरली. मानवाने दगडासोबतच तांबे या धातूचा वापर सुरू केला. लोखंडाचा शोध
लागल्यामुळे शेतीसाठी, इतर कामांसाठी हत्यारे आणि अवजारे
बनवली गेली.
काळानुसार इतिहासाचे तीन प्रकारः
अ)
प्राचीन इतिहासः इ.स.पू. ३५००-इ.स. ४७६ (भारत-इ. स. पू. ३५०० ते ६ वे शतक)
जगाच्या
प्राचीन इतिहासात सामाजिक बाबींना महत्त्वपूर्ण स्थान आहे. प्राचीन इतिहास म्हणजे
मानवजातीच्या इतिहासात अनेक प्राचीन संस्कृती उदयास आल्या, त्यांचा विकास याची माहिती याचा समावेश होतो. शेतीच्या उदयापासून ते गाव /
शहरांच्या वाढीपर्यंत याची कहाणी आहे. या संस्कृतींनी कला, साहित्य,
वास्तुकला, तत्वज्ञान, धर्म
आणि सामाजिक व्यवस्था यामध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिलेले आहे.
ब)
मध्ययुगीन इतिहासः इ.स. ४७६- इ.स. १४९२ (भारत ६ वे शतक ते ते १८ वे शतक)
या
इतिहासात राजकीय घडामोडींना जसे की विविध राजघराणी, त्यातील
राजे, युध्द, तह यांचा समावेश होतो.
मध्ययुग हा काळ केवळ युध्द, धर्म व सत्ता यापुरता मर्यादित
नव्हता, तर या काळामध्ये संस्कृती, ज्ञान,
विज्ञान, तत्वज्ञान व यांचीही प्रगती होत
गेली.
क)
अर्वाचीन इतिहासः इ.स. १४९२ पासून पुढे (भारत- इ.स. १७५७ ते पुढे)
अर्वाचीन
किंवा आधुनिक इतिहासामध्ये मध्ययुगीन इतिहास काळानंतर घडलेल्या सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक, राजकीय इ. घडामोडींचा समावेश होतो.
स्थळानुसार
इतिहासाचे प्रकार पुढील प्रमाणेः
अ)
जागतिक इतिहासः जगातील प्रत्येक देशाला स्वतःचा एक
इतिहास असतो. तेथे राहणाऱ्या समाजाची समाजरचना, आर्थिक,
सांस्कृतिक, कला, विज्ञान
यांचा कालनुक्रमाने विकास होत असतो. असे होत असताना त्या देशात घडणाऱ्या घटनांचा
त्या देशाच्या एकूणच समाजजीवनावर परिणाम होत असतो. संपूर्ण जगातील देश हे
एकमेकांशी संबंधित आहेत. एखादया देशातील एखादया घटनेचा संबंध, परिणाम दुसऱ्या देशाशी होत असतो. अशा रितीने संपूर्ण जग हे एकमेकांशी
जोडलेल्या अवस्थेत असते. अशाच भूतकाळातील जागतिक घडामोडींचा अभ्यास करणे
क्रमप्राप्त ठरते.
ब)
राष्ट्रीय इतिहासः प्रत्येक राष्ट्रामध्ये समाजजीवनाला
त्याच्या प्रत्येक कालखंडामध्ये विशेष राजकीय, आर्थिक,
सामाजिक, सांस्कृतिक घटनांना सामोरे जावे
लागल्यामुळे सामाजिक परिवर्तनाला सामोरे जावे लागते. त्यामुळे तेथील समाजजीवनावर
निश्चितच परिणाम होत असतो. या परिवर्तनाचा अभ्यास करणे आवश्यक ठरते.
क)
स्थानिक इतिहासः प्रत्येक देशाचा स्वतःचा एक स्थानिक
इतिहास असतो. चालीरिती, परंपरा यांचा तेथील समाजजीवनावर एक विशिष्ट ठसा उमटलेला असतो.
या स्थानिक इतिहासाला सुध्दा देशाच्या इतिहासामध्ये एक महत्त्वपूर्ण स्थान असते.
ड)
प्रादेशिक इतिहासः एखादया देशाच्या विशिष्ट भूभाग, प्रदेशाचा इतिहास म्हणजे प्रादेशिक इतिहास होय. प्रत्येक देशातील
वेगवेगळ्या प्रदेशाचा वैशिष्टयपूर्ण इतिहास असतो. देशाच्या एकंदरीत इतिहासाचा
विचार करता प्रादेशिक इतिहासाकडे दुर्लक्ष करता येत नाही. प्रादेशिक इतिहासातून देशाचा,
त्या राष्ट्राचा एकजिनसी इतिहास लिहिता येतो.
परिस्थितीनुसार
इतिहासाचे प्रकारः
अ)
राजकीय इतिहासः इतिहासात राजकीय घटनांनाच जास्त महत्त्व
दिले जाते. राजकीय इतिहासामध्ये त्या त्या भूभागात पुरातन काळात निर्माण झालेल्या
राजसत्ता,
त्यांचे लष्करी सामर्थ्य, युध्द, राज्यविस्तार, आर्थिक
सुबत्ता, शेजारील देशांशी त्यांचे संबंध याचा अभ्यास करता
येतो. आधुनिक राजकीय इतिहासात प्रत्येक देशातील राजकीय परिस्थिती, समाजजीवनावर त्याचा होणारा परिणाम, परराष्ट्र संबंध,
त्या देशातील घटनांचा इतर राष्ट्रांवर होणारा परिणाम, इतर राष्ट्रांशी होणारा कलह, युध्द यांचा अभ्यास
केला जातो.
ब)
सामाजिक इतिहासः राजकीय आणि आर्थिक घडामोडींचा सामाजिक
परिस्थितीवर नेहमीच प्रभाव असतो. इतिहास हा नेहमी राजे व त्यांचा राज्यव्यवहार
यांचाच असतो असे नव्हे तर त्या त्या कालावधीत असलेल्या
समाजघटकांचाही यात अंतर्भाव करावा लागतो. प्रत्येक समाजात असणाऱ्या चालीरीती, परंपरा, त्यांचे दैनंदिन व्यवहार, त्या काळात असलेला संघर्ष, संघर्षातून बाहेर पडताना
केलेल्या उपाययोजना, जीवनाच्या प्रत्येक अंगांना स्पर्शून जाणारी
सामुहिक कृती यातूनच सामाजिक जीवनाची घडी बसत जाते. याचाही अभ्यास करणे निश्चितच
गरजेचे आहे.
क)
सांस्कृतिक इतिहासः जेव्हा मनुष्य समुह रूपाने एकत्र
राहायला शिकला, तेव्हा त्याची जीवनपध्दती काही ठराविक
साचेबंद पध्दतीने पुढे जाऊ लागली. शेतीमुळे स्थलांतरीत आयुष्य एका ठिकाणी
स्थिरावल्यामुळे जीवनमान हे सामुहिकरित्या पुढे जाऊ लागले. मग अशा समाजामध्ये
एकत्रीकरणामुळे समुहजीवनाला एक सांस्कृतिक वारसा मिळू लागला. मनुष्याच्या
जन्मापासून मृत्यूपर्यंत प्रत्येक घटनेला एका विशिष्ट कृतीची जोड देण्यात आली,
मनुष्याच्या अंगी असलेला कलाविष्कार प्रकट झाला व कालांतराने ही
पध्दतच सांस्कृतिक ठेवा म्हणून गणली गेली.
ड)
धार्मिक इतिहासः समाजाच्या एकत्रीकरणातून त्यांच्या समुह
जीवनाच्या विशिष्ट अशा चालीरीती, व्यवहारामुळे समाज
धर्मबध्द होत गेला. धर्मामुळे समाज एका विशिष्ट अशा विचारसरणीला, कृतीला आयुष्याच्या केंद्रस्थानी मानू लागला, परंतु
धार्मिक नितीचा वापर करून समाजातील काही विशिष्ट घटकांनी आपल्याच समाजातील लोकांवर
वर्चस्व निर्माण केले, त्यातून अनिती, अनिर्बंध
व्यवहार यांचे स्तोम माजले. त्यानंतर त्याच समाजातील काही सुधारकांनी केलेल्या
प्रबोधनामुळे समाजरचना ढवळून निघाली, धर्माला एक नव रूप
प्राप्त झाले.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा