प्रवास इतिहासाच्या अंतरंगात
इतिहास म्हणजे काय ?
भूतकाळात घडलेल्या घटनांचा वृत्तांत म्हणजे इतिहास होय. Historia
या ग्रीक शब्दापासून History हा शब्द रूढ झालेला आहे. या शब्दाचा अर्थ भूतकाळात, भूतकाळापासून घडून गेलेल्या घटनांचा, परिस्थितीचा अभ्यास असा होतो.
इतिहासाच्या विविध व्याख्याः
हिरोडोट्स (Herodotus): भूतकालीन संस्मरणीय व मनोरंजक घटनांचा शोध म्हणजे इतिहास होय.
थ्युसीडाइड्स : अनुभवांच्या साहयाने
तत्वज्ञानाचे अध्यापन करणे.
इतिहासाने माणसाची कहाणी त्याच्या जन्मापासून प्रामाणिकपणे आणि
शास्त्रीय पध्दतीने सांगितली पाहिजे. धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक, वाङ्मयीन या जीवनाच्या अनेक बाजूंचा इतिहासाच्या अभ्यासात
समतोलपणे विचार केला पाहिजे.
व्यक्ती, किंवा व्यक्तीचा समुदाय यांनी त्याचे जीवनमान सुकर
करण्यासाठी, जीवन
स्तर उंचावण्यासाठी केलेल्या कृती, क्रिया आणि त्यांच्या क्रियेला अन्य व्यक्ती किंवा
व्यक्तींच्या समुदायाकडून मिळणाऱ्या प्रतिक्रिया यातून अनेक घटनांचा उगम होतो. या
घटनांचा तत्कालीन सामाजिक, आर्थिक, राजकीय
परिस्थितीनुरूप उपलब्ध असलेल्या साधने व पुराव्यांच्या आधारे अभ्यास केला जातो.
कोणत्याही ऐतिहासिक घटनांचे उपलब्ध साधन, पुरावे यांच्या आधारे घटनेचे विश्लेषण करून तर्कसंगत विवरण
तयार करणे म्हणजे इतिहास होय.
इतिहासकार ज्या काळात इतिहासलेखन करतो, त्या काळातील परिस्थितीचा त्याच्या इतिहासलेखनावर परिणाम
होणे शक्य असते. गत घटनांचा संग्रह करणे व त्यांची पध्दतशीर मांडणी करणे यासाठी
इतिहासलेखनकाराला प्रयत्न करावे लागतात. ऐतिहासिक घटनांची तत्कालीन प्रेरणा, प्रवृत्ती, विचार व हितसंबंध यांच्या संदर्भात तर्क संगत कारणमीमांसा
केल्याने इतिहास अर्थपूर्ण बनतो.
इतिहासात चिकित्सा, तर्कनिष्ठता, वस्तुनिष्ठता व शिस्तबध्दता या गोष्टीना महत्त्व प्राप्त झाले.
इतिहासकाराची भूमिका शास्त्रज्ञाची आहे. त्याची पध्दती शास्त्रीय आधारावर अधिष्ठित
आहे. भूतकालीन घडलेल्या घटना समजुन घेऊन सत्याचा शोध या दृष्टीने इतिहास हे
शास्त्र आहे. भूतकाळातील घटनांचे शोध करून देणारे शास्त्र म्हणजे इतिहास होय.
इतिहासकार ऐतिहासिक सत्य शोधण्यासाठी संशोधन करतो.
भौतिकशास्त्रातील वस्तुनिष्ठतेप्रमाणे इतिहासात देखील कोणतेही ऐतिहासिक साधन किंवा
वस्तू स्वतंत्र पुराव्यांखेरीज ग्राह्य मानण्यात येत नाहीत. इतिहासात तथ्यांची
चिकित्सा,
विश्लेषण व वर्गवारी करण्यात येवून त्यांच्या आधारावर काही
निष्कर्ष काढले जातात.
इतिहासात शास्त्रांची तर्कशुध्दता, तत्ववेत्यांचे बुध्दिप्रामाण्य, साहित्यिकाची कल्पनाशक्ती, साहित्यिकाची भाषा व विवेचन शैली यांचा सुरम्य मिलाफ झालेला
दिसतो. भूतकाळातील मानवी उत्क्रांती व संस्कृती यांचा पध्दतशीर अभ्यास म्हणजे
इतिहास अशी इतिहासाची आधुनिक व्याख्या केली जाते.
कोणताही पुरावा प्रत्यक्ष प्रयोगांच्या कसोटयांवर पुन्हा
पुन्हा तपासून पाहता येणे, हे या सर्व शास्त्रांचे वैशिष्ट्य असते. प्रत्येक पुरावा वेगवेगळया कसोटयांवर
तपासून तो विश्वास ठेवण्याजोगा आहे की नाही हे ठरवण्याच्या पध्दतीला शास्त्रीय
पद्धत असे म्हणतात. कसोटीला उतरलेल्या उपलब्ध पुराव्यांच्या आधारे गतकाळातील घटना
संगतवार,
क्रमवार पध्दतीने जुळवून इतिहासाची पध्दतशीर मांडणी केली
जाते,
ही शास्त्रीय पद्धत होय.
इतिहास केवळ असे घडले असेल, या क्रियेला अशी प्रतिक्रिया मिळाली असेल असे केवळ
कल्पनेच्या आधारे लिहिला जात नाही. त्यातील पुरावा शोधण्यासाठी, तपासण्यासाठी शास्त्रीय पद्धतीचाच उपयोग केला जातो.
त्यासाठी अन्य शास्त्रांचीही मदत घेतली जाते, म्हणून इतिहास हे एक शास्त्र आहे असे म्हटले जाते.
भूतकाळातील मानवी जीवनाचे विचार, कृती आणि कृतींचे परिणाम यांचा शोध घेऊन अनेक प्रश्नांची
उत्तरे इतिहास शोधतो.
मानवाने आसपासच्या परिसरात उपलब्ध असलेल्या साहित्यांतून
हत्यारे निर्माण करण्याची कला आत्मसात केली. अग्नीचा वापर कसा करावा हे शोधून
काढले व पुढे त्याने चाकाचा शोध लावला.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा