पोस्ट्स

इतिहासाचे प्रकारः

इमेज
  इतिहासाचे प्रकारः या लेखामध्ये आपण इतिहासाचे प्रकार याबाबत माहिती घेणार आहोत. प्रागैतिहासिक काळः (इ.स.पू. २५ लाख वर्षापूर्वी -   इ.स.पू. ३५००) : हा काळ मानवाच्या उत्क्रांतीचा व सुरूवातीच्या विकासाचा काळ असे म्हटले जाते. या काळाचा कोणताही लिखित पुरावा उपलब्ध नाही. या काळाची उत्खननात सापडलेली हत्यारे , भांडी , गुहांमधील चित्रांच्या आधारे माहिती मिळते. या काळात मानवाने शिकार करण्यासाठी दगडाची , लाकडाची , हाडांची हत्यारे वापरली. मानवाने दगडासोबतच तांबे या धातूचा वापर सुरू केला. लोखंडाचा शोध लागल्यामुळे शेतीसाठी , इतर कामांसाठी हत्यारे आणि अवजारे बनवली गेली. काळानुसार इतिहासाचे तीन प्रकारः अ) प्राचीन इतिहासः इ.स.पू. ३५००-इ.स. ४७६ (भारत-इ. स. पू. ३५०० ते ६ वे शतक) जगाच्या प्राचीन इतिहासात सामाजिक बाबींना महत्त्वपूर्ण स्थान आहे. प्राचीन इतिहास म्हणजे मानवजातीच्या इतिहासात अनेक प्राचीन संस्कृती उदयास आल्या , त्यांचा विकास याची माहिती याचा समावेश होतो. शेतीच्या उदयापासून ते गाव / शहरांच्या वाढीपर्यंत याची कहाणी आहे. या संस्कृतींनी कला , साहित्य , वास्तुकला , तत्वज्ञान , ध...

प्रवास इतिहासाच्या अंतरंगात

इमेज
इतिहास म्हणजे काय ? भूतकाळात घडलेल्या घटनांचा वृत्तांत म्हणजे इतिहास होय. Historia या ग्रीक शब्दापासून History हा शब्द रूढ झालेला आहे. या शब्दाचा अर्थ भूतकाळात , भूतकाळापासून घडून गेलेल्या घटनांचा , परिस्थितीचा अभ्यास असा होतो. इतिहासाच्या विविध व्याख्याः हिरोडोट्स ( Herodotus): भूतकालीन संस्मरणीय व मनोरंजक घटनांचा शोध म्हणजे इतिहास होय. थ्युसीडा इ ड्स : अनुभवांच्या साहयाने तत्वज्ञानाचे अध्यापन करणे. इतिहासाने माणसाची कहाणी त्याच्या जन्मापासून प्रामाणिकपणे आणि शास्त्रीय पध्दतीने सांगितली पाहिजे. धार्मिक , सामाजिक , सांस्कृतिक , आर्थिक , वाङ्मयीन या जीवनाच्या अनेक बाजूंचा इतिहासाच्या अभ्यासात समतोलपणे विचार केला पाहिजे. व्यक्ती , किंवा व्यक्तीचा समुदाय यांनी त्याचे जीवनमान सुकर करण्यासाठी , जीवन स्तर उंचावण्यासाठी केलेल्या कृती , क्रिया आणि त्यांच्या क्रियेला अन्य व्यक्ती किंवा व्यक्तींच्या समुदायाकडून मिळणाऱ्या प्रतिक्रिया यातून अनेक घटनांचा उगम होतो. या घटनांचा तत्कालीन सामाजिक , आर्थिक , राजकीय परिस्थितीनुरूप उपलब्ध असलेल्या साधने व पुराव्यांच्या आधारे अभ्यास केला जातो. क...